Umed – Maharashtra State Rural Livelihoods Mission - Find out more →

News & Blog

प्रीतीताई यांनी काय केली जादू की महिन्याला कमावतात तीस हजार रुपये.

प्रीती निपाणे यांचा यशस्वी प्रवास

News & Blog

प्रीतीताई यांनी काय केली जादू की महिन्याला कमावतात तीस हजार रुपये.

प्रीतीताई यांनी काय केली जादू की महिन्याला कमावतात तीस हजार रुपये.

प्रीतीताई निपाणे रा. आंधळगाव जि. भंडारा येथील असून यांनी आपल्या गावामध्ये बँक ऑफ इंडिया बँकेकडून बीसी ग्राहक सेवा केंद्र स्थापन केले आहे .

प्रीतीताई यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी असे काय केले की त्या दर महिन्याला २५ ते ३० हजार रुपये कमवितात.

प्रीतीताई आपल्या ग्राहक सेवा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांचे संपर्क माहिती रजिस्टर मध्ये नोंद करून ठेवतात ,

ग्राहकांसोबत सामंजस्याने वागतात ,आपुलकीने ग्राहकांची विचारपूस करतात ,शासनाच्या योजना ग्राहकापर्यंत पोचवितात.

DBT योजनांची माहिती प्रीतीताईंना ५ दिवसांच्या आधीच मिळते, त्यानुसार प्रीतीताई आपल्या गावांमध्ये बैठक आयोजीत करतात.

गावातील नागरिकांना प्रधान मंत्री किसान सन्मान योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शालेय शिष्यवृत्ती, त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल यांची माहिती देतात.

त्यामुळे त्यांच्या केंद्रांवर ग्राहकांची संख्या वाढते. त्यामुळे त्यांचे आर्थिक उत्पन्न सुद्धा वाढत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

MH BC SAKHI

Translate »